बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिवाळीत कांदा पुन्हा रडवणार, कांद्याच्या भावात अचानक वाढ; जाणून घ्या कारण

मुंबई | महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यातच कांदा पिकाचं देखील खूप नुकसान झालं आहे. यामुळे जुन्या कांद्याची मागणी वाढत आहे आणि याचाच परिणाम थेट कांद्याच्या भावावर होत आहे. किरकोळ बाजारात सध्या 50 ते 60 रुपये किलोने कांदा मिळत आहे.

नवीन कांदा बाजारात येण्यास आणखी काही काळ लागू शकतो. यामुळे दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता कांदा व्यापारी वर्तवत आहेत. तसेच नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी कांद्याची पुन्हा पेरणी केली आहे. हा कांदा नोव्हेंबरपर्यंत मार्केटमध्ये येईल.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये मुबलक प्रमाणात कांद्याचा साठा उपलब्ध आहे. यामुळे इतर राज्यांकडून या दोन राज्यांकडे कांद्याची मागणी केली जात आहे. परंतु मागणीच्या तुलनेत येथील शेतकरी कांद्याचा पुरवठा करू शकत नाहीत. यामुळे कांद्याचा भाव वाढत चालला आहे.

दरम्यान, नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमध्य 30 ते 35 रुपये किलो दराने कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मुंबई आणि ठाण्याच्या बाजारात हा कांदा सध्या 50 ते 55 रुपये किलोने विकला जात आहे. परंतु हाच भाव शंभरीकडे जाण्याची शक्यता काही कांदा व्यापारी वर्तवत आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘भारताला हारव नाहीतर तुला पाकिस्तानात एन्ट्रीच नाही’; सामन्याआधी बाबर आझमला धमकी

राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागितली; ‘या’ मराठी चित्रपट दिग्दर्शकाला अटक

‘…तर समजून जावं नवरत्न तेलाने चंपी करण्याची वेळी आलीये’; मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर टीका

रामलीला सुरु असताना राम नामाच्या गजरात दशरथने मंचावरच सोडले प्राण, प्रेक्षकांना वाटला अभिनय

‘मला टाॅपलेस पंतप्रधान व्हायचंय’; तरूणीने व्यक्त केली अजब इच्छा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More