महाराष्ट्र मुंबई

अजबच!!! मुंबईत चोरट्यांनी पळवल्या कांद्याच्या गोणी

मुंबई | देशभरात कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असताना आता मुंबईत कांदाचोरीची घटना उघडकीस आली आहे. डोंगरी परिसरातून 21 हजार रुपये किमतीचा कांदा चोरीला गेला आहे.

देशात कांद्याच्या वाढत्या किमती थांबताना दिसत नाही. त्यातच आता कांद्याची चोरी सुरु झाल्याचं दिसत आहे. मुंबईतील डोंगरी परिसरात दोन दुकानांमध्ये कांदा चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंगरीमध्ये जेल रोडच्या बाजूला असलेल्या भाजी मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रहमत बी शेख कांदे-बटाटे विकतात. त्यांच्या स्टॉलवरुन 5 डिसेंबरच्या रात्री 8 वाजल्यानंतर अज्ञात इसमाने दोन गोणी कांदे चोरल्याची माहिती आहे.

दरम्यान, दोन गोण्यांमध्ये 112 किलो म्हणजेच अंदाजे 13 हजार 440 रुपये किमतीचा कांदा होता. स्टॉलधारक रहमत बी यांचा मुलगा अकबर शेखने याप्रकरणी पोलिसात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या