बिहार | बिहारमध्ये सध्या निवडणूकीचे वारे वाहतायत. बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु झालंय. दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार भाषणाला उभे राहताच त्यांच्या कांदा फेकण्यात आल्याची घटना घडलीये.
मधुबनीच्या हरखालीमध्ये नितिशकुमार सभेमध्ये जनतेला संबोधित करत होते. यावेळी सभेत त्यांनी नोकरी विषयी बोलण्यास सुरुवात केली. दरम्यान याचवेळी समोरील गर्दीतून कोणीतरी त्यांच्यावर कांदा फेकला.
#Correction: Onions pelted during Chief Minister Nitish Kumar’s election rally in Madhubani’s Harlakhi.#BiharPolls pic.twitter.com/0NwXZ3WIfm
— ANI (@ANI) November 3, 2020
कांदा फेकल्यावर देखील नितीश कुमार यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. ते म्हणाले, “फेका, फेका.. जितके फेकायचे आहेत तितके फेका. या लोकांना सोडून द्या काही दिवसानंतर त्यांना स्वतःलाच समजेल.”
कांदा फेकण्यात आला तेव्हा नितिशकुमारांना सुरक्षा रक्षकांनी घेरत सुरक्षा पुरवली. सुरक्षारक्षकांनी ज्यावेळी कंदा फेकणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा नितिशकुमारांनीच नका पकडू असं सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
“कांजूरमार्ग कारशेडचं काम थांबवण्याचं भाजपचं कटकारस्थान आहे”
राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्र सरकार करतंय- सुप्रिया सुळे
“घंटी वाजवली, फोनची लाईटही लावली मात्र मोदींनी…”
‘या’ कारणाने सूर्यकुमारला टीम इंडियात जागा नाही; रवी शास्त्रींनी सोडलं मौन
कंगणा राणावत आणि रंगोलीला मुंबई पोलिसांकडून समन्स; 10 नोव्हेंबरला हजर रहावं लागणार