Top News विदेश

ऑनलाईन मागवली कोल्डड्रिंक अन् बाटलीत निघाली…; तुम्हालाही वाचून बसेल धक्का!!!

Photo Credit- Facebook/ Coca-Cola

ब्रिटन | आजकाल ऑनलाईन फूड डिलीव्हरी च्या सहाय्यानं‌ घरी बसून हॉटेलमधील जेवनाची चव चाखायला मिळते. अनेक जणं आवडीनं वारंवार ऑनलाईन जेवण ऑर्डर करत असतात. अनेक ठिकाणी ऑनलाईन जेवनात त्रुटी आढळून येत असतात. अशीच काहीशी घटना इंग्लंडमध्ये घडली आहे.

इंग्लंड मधील रहिवासी असणाऱ्या ऑलिव्हर मॅकमॅनस नावाच्या व्यक्तीनं खाण्याचे काही पदार्थ आणि कोल्डड्रिंक ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. मात्र जेव्हा त्याने कोल्डड्रिंक पिण्यासाठी हातात घेतलं तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण कोल्डड्रिंकच्या बाटलीमध्ये चक्क कोल्डड्रिंक नव्हे तर माणसाची लघवी असल्याचं समजलं.

या व्यक्तीनं खाण्यासाठी काही नॉन-व्हेज पदार्थांसह कोल्डड्रिंक ऑर्डर केली होती. त्या बाटलीमध्ये माणसाची लघवी आढळून आल्याची माहिती ऑलिव्हर मॅकमॅनस स्वत: ट्विट करून दिली होती. त्याच्या ट्विट नंतर सोशल मिडीयावर सर्वत्र याच ऑर्डरची चर्चा आहे.

दरम्यान, आपल्यापैकी कित्येक जण ऑनलाइन जेवण ऑर्डर करतात. मात्र ज्या ठिकाणावरून आपण जेवण ऑर्डर करत आहोत ते ठिकाण विश्वासातील आहे का?, याची खातरजमा करून घेणे आपली जबाबदारी आहे.

थोडक्यात बातम्या- 

शिवसेना नेते अनंत तरे यांचं निधन

आता फक्त माझी जबाबदारी म्हणून हात वर करता येणार नाहीत- नवनीत राणा

तुमच्या उपस्थित शिवनेरीवर मास्कची ढाल गेली कुठे?; भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल

धक्कादायक! मुंबईतील हाॅटेलमध्ये खासदाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अर्जुन तेंडुलकरला ट्रोल करणाऱ्यांना फरहान अख्तरनं सुनावलं; म्हणाला….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या