ऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार?

मुंबई | व्हिसा, मास्टर कार्ड आणि अमेरिकन एक्सप्रेससारख्या जागतीक ग्लोबल पेमेंट कंपन्यांना भारतात होणाऱ्या उत्पन्नावर 15 टक्के कर भरावा लागण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँकेने या पेमेंट कंपन्यांना भारतातच डेटा स्टोरेज करण्याचं बंधनकारक केलं आहे. त्यामुळे या कंपन्या कराच्या जाळ्यात येणार आहेत.

त्यामुळे होणारा अतिरिक्त खर्च कंपन्या ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास क्रेडिट, डेबिट तसेच अन्य कार्डद्वारे होणारे व्यवहार महाग होणार आहेत.

पेमेंट कंपन्या सिंगापूरस्थित कार्यालयातून आपला व्यवहार पाहत होत्या. रिझर्व्ह बँकेच्या या नव्या नियमामुळे त्यांना सर्व माहितीचा साठा भारतातच करावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-नरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली; गुजरात दंगल प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

-मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस?

-ही ‘समृद्धी’ कुणाची?; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद

-मराठा समाजाची प्रतिक्षा संपली? 2 दिवसात सादर होणार अहवाल???

-मराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने