बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑनलाईन पिझ्झा मागवणं पडलं महागात, महिलेला बसला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा गंडा

मुंबई | लोक खाण्या-पिण्याचे एवढे शौकिन असतात की खाण्यासाठी काहीही करु शकतात. अशातच आता खाण्याच्या सोई-सुविधांमध्येही सहजता आली आहे. हल्ली ऑनलाईन फूड मागवण्याचं क्रेझ मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत असतं. मात्र कधी-कधी ऑनलाईन मागवणं चांगलंच महागात पडतं.

मुंबईतील अंधेरीमधील एका महिलेनं ऑनलाईन फूड मागवलं होतं. मात्र ऑनलाईन मागवणं या महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. एका वृद्ध महिलेनं ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला होता. मात्र या वृद्ध महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

या वृद्ध महिलेला तब्बल 11 लाखांचा ऑनलाईन गंडा बसला आहे. या वृद्ध महिलेनं ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करताना जास्त पैसे पाठवले होते. ते परत मिळवण्यासाठी तिनं गुगलला प्रोसेस चेक केली. तिथे तिला एक नंबर मिळाला. त्यावर फोन केला असता तिला एक विशेष असं अॅप डाऊनलोड करायला सांगितलं आणि महिलेच्या खात्यातून 11 लाख रुपये गायब झाले.

दरम्यान, या महिलेनं पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर सायबर सेलनं याविषयी तपास केला. सायबर गुन्हेगारांनी महिलेची बँक खाती आणि इतर माहिती जाणून घेतली होती आणि त्यानंतर गंडा घातला आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘या’ ठिकाणी मास्क घालण्यात हलगर्जीपणा, पोलिसांनी आकारला तब्बल एवढा दंड

चिंताजनक! कोरोना रुग्णसंख्येत वाढ, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

धक्कादायक! ‘इतक्या’ वेळा होऊ शकते ओमिक्राॅनची लागण

सेल्फ टेस्टिंगसाठी मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय, वाचा नवी नियमावली

“मराठी भाषेवर इतकं प्रेम आहे तर सरकारनेच दुकानांच्या सर्व पाट्या बदला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More