ऑनलाईन बलात्कार करणाऱ्याला जगात पहिल्यांदाच शिक्षा

स्टॉकहोम | ऑनलाईन बलात्कार केल्याप्रकरणी ब्योन सैमस्ट्रोम नावाच्या 41 वर्षीय व्यक्तीला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. स्वीडनची राजधानी स्टॉकहोममधील एका न्यायालयानं हा निर्णय दिलाय. 

ब्योनवर 27 अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. तो त्यांना वेबकॅमवर लैंगिक कृती करायला लावायचा अन्यथा कुटुंबियांना ठार करण्याची किंवा व्हिडिओ पोर्न वेबसाईटवर टाकण्याची धमकी द्यायचा.

दरम्यान, न्यायालयाने हा गुन्हा ऑनलाईन बलात्कार असल्याचं मान्य करत आरोपीला शिक्षा सुनावली. त्यामुळे अशाप्रकारे सुनावली गेलेली ही जगातील पहिलीच शिक्षा आहे.