बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंमली पदार्थ देऊन करायचे…;ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नवी दिल्ली | सध्या दिवसेंदिवस अपहरणाच्या गुन्हात वाढ होताना दिसत आहे. तर त्याचबरोबर सायबर गुन्हात आणि देहविक्रीच्या गुन्हात देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत असाच एक प्रकार समोर आला आहे. मुलींना अंमली पदार्थ देऊन त्यांची 5 स्टार हाॅटेलमध्ये त्यांची देहविक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दिल्लीच्या राजौरी गार्डनच्या परिसरात एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं होतं. त्यानंतर पोलीस चौकीत यावर गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी यात अनेक ठिकाणी छापे टाकले, खबऱ्यांकडून माहिती मिळवून तपास चालू ठेवला. पोलिसांनी या प्रकरणात आधिक तपास केल्यानंतर ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यात पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली आहे. यामध्ये 2 तरूणींचा समावेश आहे. केक कापण्याच्या बहाण्याने या आरोपी केक खायला देत असतं. केकमध्ये अंमली पदार्थ मिसळल्याने केक खाल्यानंतर तरूणी बेशुद्ध होत होत्या. याचाच फायदा घेत तरूणीचं अपहरण केलं जातं होतं आणि त्यांना सेक्स रॅकेटमध्ये जबरदस्तीने कामाला लावलं जातं होतं.

दरम्यान, या सर्व आरोपींना कोर्टात हजर केलं असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  संजय, अंशू , कनिया राॅय, सपना गोयल अशी या आरोपींची नावं आहेत. तर पोलीस आता अंमली पदार्थच्या दिशेने तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘रात्री 11 पर्यंत न थकता काम, काय खाता?’; अभिनेत्याचा किशोरी पेडणेकरांना सवाल, म्हणाल्या…

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर; त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करुन घेतली”

…म्हणुन ख्रिस गेलने मानले पंतप्रधान मोदींसह भारतीयांचे आभार, पाहा व्हिडिओ

एक डाव लग्नाचा! पत्रिकेतील मंगळ काढण्यासाठी शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबतच रंगवली रात्र

धक्कादायक! थुंकी लावून रोटी करायचा, समोर आला किळसवाणा प्रकार, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More