ऑनलाईन मागवला मोबाईल; बॉक्समध्ये निघाला विटेचा तुकडा

औरंगाबाद | फ्लिपकार्टवर ऑनलाईन फोन मागवला आणि पार्सलमध्ये विटेचा तुकडा आला. हा प्रकार गजानन भानुदास खरात यांच्यासोबत घडला आहे. 

खरात यांनी 9 ऑक्टोबरला मोटो कंपनीचा मोबाईल बुक केला होता. मोबाईलची किंमत 9 हजार 139 रुपये अशी होती. ती रक्कम त्यांनी ऑनलाईन भरली होती. 

14 तारखेला फोनचं पार्सल आले. कुरियर कंपनीचा कर्मचारी गेल्यावर त्यांनी पार्सल उघडलं तर त्यात मोबाईल एेवजी चक्क विटेचा तुकडा होता. 

दरम्यान, खरात यांनी तडकाफडकी पोलिस स्टेशनात फ्लिपकार्ट आणि कुरियर कंपनी विरोधात फसवणूक आणि अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo | महिलांविरोधात लढा देण्यासाठी एम. जे. अकबर यांची 97 वकिलांची फौज

-दिल्लीच्या हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवेंमध्ये खलबतं

-शिवसेनेचा मोठा निर्णय; मध्य प्रदेशमध्ये सर्वच्या सर्व 230 जागा स्वबळावर लढणार!

-महाराष्ट्रात अकलेचा दुष्काळ पडला आहे की काय?; शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

-आज कंदिल घेऊन आलोय, उद्या मशाली घेऊन येऊ; धनंजय मुंडेंचा सरकारला इशारा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या