बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशभरात फक्त 10 ते 15 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे”

नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोनामुळे हाहाकार माजलेला आहे. त्यातच आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत असल्याचं भयावह चित्र सध्या अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. रुग्णांना व्हेंटिलेटरची कमतरता तसेच ऑक्सिजनची ही कमतरता जाणवत आहे. यावर एम्सचे संचालक डॉक्टर रणदिप गुलेरिया यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

एम्स रुग्णालयाचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दावा केला आहे की, देशभरात फक्त 10 ते 15 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे. तर फक्त 5 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. रणदीप गुलेरिया यांनी केलेल्या या दाव्यानंतर नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तज्ञ डॉक्टरांची ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीत मेदांताचे चेअरमन डॉ. नरेश त्रेहान, डॉ. नवीत विग, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यासह अन्य तज्ञांचा समावेश होता. यावेळी डॉक्टर त्रेहान यांनी देशातील ऑक्सीजनचा प्रश्न येत्या 5 ते 7 दिवसात सुटेल अशी आशा व्यक्त केली.

दरम्यान, डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी कोरोना हा सामान्य आजार असून लोकांनी घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं बोलून दाखवलं. त्याबरोबरच, देशभरातील 85 टक्के रुग्ण यांना सामान्य लक्षण असून ते घरीच राहून व्यायाम प्राणायाम तसेच योगा करून दहा ते पंधरा दिवसात कोरोनावर मात करू शकतात, असं रणदीप गुलेरिया यांनी यावेळी बोलून दाखवलं.

थोडक्यात बातम्या –

“औषधांचा काळाबाजार आणि अफवा पसरवणाऱ्यांवर…”; योगी आदित्यनाथ यांनी घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

इराकमध्ये अग्नितांडव! ऑक्सीजन सिलेंडर स्फोटात 82 रुग्णांचा मृत्यू

“महासत्ता नाही, ‘महाथट्टा’ नक्कीच झालीय”; अभिनेता हेमंत ढोमेने व्यक्त केला संताप

जोतिबा यात्रेवर कोरोनाचं सावट; यात्रेतील मानकरीच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने यात्रा रद्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More