बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता विमानप्रवास करा फक्त 26 रुपयांत, व्हिएतजेट एअरलाईन्सची खास ऑफर

नवी दिल्ली | तुम्हाला जर परदेश गमनाची इच्छा असेल आणि ती सुद्धा भारताच्या चलनापेक्षा कमी किंमत असलेल्या देशात तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आता तुम्ही भारत ते व्हिएतनाम (Vietnam) प्रवास फक्त 26 रुपयांत करु शकता. व्हिएतनामची एक विमान कंपनी तुम्हाला ही संधी देत आहे. ही जबरदस्त सवलत व्हिएतनामच्या व्हिएतजेट एअरलाईन्स (Vietjet Airliine)आणली आहे.

ही विमानसेवा कंपनी तुम्हाला, 9000 व्हिएतनामी डोंग (VND) च्या विमान भाड्यावर तिकीट सवलत घेऊन आली आहे. व्हिएतनामी चलनाचे मूल्य भारतीय चलनाच्या तुलनेत खूपच कमी आहे. 9000 हजार व्हिएतनामी डोंग (Vietnamese Dong) भारतीय चलनाच्या (Indian Rupee) सुमारे 25 ते 30 रुपये इतके आहेत. व्हिएतजेट एअरलाईन्स ही सवलत सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील उड्डाणांसाठी आहे.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना 13 जुलै पर्यंत तिकीट बूक करावे लागेल. यानंतर प्रवासी 26 मार्च 2023 नंतर प्रवासाची वेळ निवडू शकतात. भारतीय प्रवाशांसाठी ही सवलत सप्टेंबरपासून सुरु होईल. प्रवासी मुंबई किंवा दिल्लीवरुन हनोई, हो ची मिन्ट सिटी आणि व्हिएतनाम मधील फु क्वोक यासाठी तिकीटे बूक करु शकतात.

व्हिएतजेट एअरलाईन्सने अलिकडे भारतातून 5 नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांवर हवाई सेवा सुरु केली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, अहमदाबाद आणि बंगळूर ही शहरे अडा नांग शहराशी जोडली गेली आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘सत्ता बदलली, आता गाठ माझ्याशी आहे’; निलेश राणेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

उपवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही?, नवीन संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

तीव्र विरोधानंतर ‘अग्निपथ’ योजनेबाबत राजनाथ सिंह यांनी घेतली महत्त्वाची बैठक

‘मी काही इतक्या लवकर जात नाही’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

गाडीच्या हॉर्नच्या आवाजावर तरूणांनी केला नागीन डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More