बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकलीने देश कोरोनामुक्त होण्यासाठी ठेवले पूर्ण रोजे

बुलडाणा | देशात कोरोनाने हाहाकार घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवाही ही धडकी भरवणारी आहे. कोरोना संकटाच्या काळात पवित्र रमजान महिना सुरु आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सर्व जग आणि देश कोर कोरोनामुक्त होण्यासाठी  बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील 9 वर्षाच्या अबीरा फहिम देशमुख या चिमुकलीने रमजान महिन्याचे सर्व उपवास ठेवले आहेत.

शेगाव येथील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अबीरा देशमुख हिने सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात रोजाच्या नियमांनुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटी राहून अल्लाहच्या प्रति श्रद्धा व्यक्त केली. देश या कोरोना संकटातून बाहेर पडावा अशी विशेष प्रार्थना अल्लाहकडे दररोज ही चिमुकली रोजा इफ्तार करतांना कुटुंबीयांसोबत करत आहे.

कोरोना काळात सरकारना घातलेले नियन आणि अटी काही बेजबाबदार नागरिक पाळत नाहीत. त्यांच्या अशा वागण्यामुळे कोरोना आणखीनच फोफावत चालला आहे. मात्र अबीराने उपवाल करून बेजबाबदार नागरिकांना आदर्शाचं उदाहरण दिलं आहे. तुम्ही उपवास करू नका पण किमान सरकारने जे काही नियम केले आहेत त्यांचं तरी पालन करा.

दरम्यान, आताच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या हाल अपेष्ठा पाहून रुग्णांची सेवा करण्यासाठी अबीराने आपल्याला डॉक्टरच व्हायचंय असा निश्चय केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा- देवेंद्र फडणवीस

‘माझ्या सूनेचे क्रिकेटर इरफान पठाणसोबत अनैतिक संबंध’; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

कोरोनाबाधित रुग्णाला एका दिवसात बरं केल्याचा दावा, डॅाक्टरवर गुन्हा दाखल

‘हिन्दुस्तानी भाऊ’ला पोलिसांनी घेतलं ताब्यात, जाणून घ्या कारण; पाहा व्हिडीओ

जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ म्हणण्याची वेळ आली- राधाकृष्ण विखे पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More