बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सद्यस्थितीत कोणताही पक्ष भाजपला पराभूत करू शकत नाही”

नवी दिल्ली | महाराष्ट्रात गेल्या महिन्यात झालेल्या सत्तासंघर्षामुळे महाराष्ट्राचं राजकारण सध्या देशभरात चर्चेत आहे. आतापर्यंत अनेक आजी-माजी केंद्रीय मंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. त्यातच आता भाचपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा(J.P. Nadda) यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आता देशाच्या कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी(BJP) लढण्याची क्षमता राहिली नाही. आता देशातील सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील आणि फक्त भाजप उरेल. सद्यस्थितीत कोणताही पक्ष भाजपला पराभूत करू शकत नाही, असं खळबळजनक वक्तव्य जे.पी. नड्डा यांनी पटणा येथे एका जाहीर सभेत केलं आहे.

तसेत महाराष्ट्राच्या राजकरणावरही त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्रात शिवसेना (Shivsena) संपत चालली आहे. आता महाराष्ट्रात फक्त कमळ फुलणार, असंही ते यावेळी म्हणाले. जे.पी. नड्डा यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातही मोठी खळबळ उडाली आहे.

काँग्रेससह(Congress) इतर स्थानिक पक्ष एकतर संपले आहेत किंवा ते लवकरच संपणार आहेत. सगळे गेले, संपले, जे संपले नाहीत ते लवकरच नष्ट होतील. भाजप वैचारिक पार्श्वभूमी घेऊन उभे आहे. आम्हाला जर कल्पना असती तर आम्ही एवढा मोठा लढा लढलोच नसतो. जे दोन-तीन शतके इतर पक्षात होते, ते आता भाजपमध्ये येत आहेत. आता देशात बदल करण्याचे कोणते साधन उरले असेल तर ते भाजप आहे, हे सर्वांना समजलं आहे. याच कल्पनेच्या आधारे आता दक्षिणेमध्येही कमळ फुलवू, असा विश्वास नड्डा यांनी पाटणा येथे राज्यातील 16 भाजप कार्यालयांचे उद्घाटन करताना व्यक्त केला.

थोडक्यात बातम्या-

राऊतांच्या घरी सापडलेल्या 10 लाखांच्या पाकिटावर एकनाथ शिंदेंचं नाव, शिंदे म्हणतात…

संजय राऊतांच्या घरातून ‘इतक्या’ लाखांची रोकड जप्त

सर्वात मोठी बातमी! संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं

“या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा”

मुख्यमंत्र्याचं सूचक वक्तव्य, लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More