बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“‘रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजप नाही”

नवी दिल्ली  | कृषी कायद्यासंदर्भात राज्यसभेत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सरकारची बाजू मांडली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसपक्षावर सडकून टीका केली.

पाण्यानेच शेती होते. रक्ताने शेती फक्त काँग्रेस करु शकतं. भाजप रक्ताने शेती करु शकत नाही, अशी टीका नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर केली आहे.

देशात सध्या उलटी गंगा वाहत आहे. शेतकरी संघटनांना दोन महिन्यांपर्यंत विचारण्यात आलं की कायद्यात काही चूक आहे का? मात्र शेतकरी नेते ते सांगू शकले नाही. आम्ही कर माफ केला, तर आता राज्य सरकार कर आकारत आहे. जे कर आकारत आहेत त्यांच्याविरोधात आंदोलन व्हायला हवं, असं नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

दरम्यान, भारत सरकार कायद्यात कोणत्याही बदल करण्यासाठी तयार आहे. याचा अर्थ असा लावला जाऊ नये की कृषी कायद्यात काही चूक आहे. संपूर्ण राज्यात लोक या एका गैरसमजाचे बळी पडले असल्याचंही नरेंद्रसिंह यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेस हायकमांडने प्रणिती शिंदेंवर सोपवली ‘ही’ नवीन जबाबदारी

‘मराठ्यांसह ‘यांनाही’ आरक्षण द्या’; रामदास आठवलेंची मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड!

‘राज्यपालांनी आता अंत पाहू नये’; अजित पवार संतापले

‘सोबत चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे’; काँग्रसेच्या ‘या’ बड्या नेत्यानी केली मागणी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More