बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच ‘या’ राज्यात मिळणार प्रवेश

लखनऊ | कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरत चालली आहे. तोच तिसऱ्या संभाव्य लाटेविषयी तज्ञांकडून शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या राज्यातून उत्तर प्रदेशात दाखल होणाऱ्या लोकांसाठी योगी सरकारनं काही महत्वाचे निर्णय जारी केले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत बाहेरील राज्यांतून येणाऱ्या लोकांसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. या बैठकीत उत्तर प्रदेशात प्रवेश करायचा असेल तर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक केलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर अॅंटिजेन टेस्ट आणि थर्मल स्कॅनिंग करण्यास सांगितलं आहे.

ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव 3 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात आहे. त्या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. चाचणी केलेला रिपोर्ट जर चार दिवस जुना असेल तरच गृहित धरला जाणार आहे. यामध्ये कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना यातून सूट देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता उत्तर प्रदेश सरकारनं शनिवारी कावड यात्रा रद्द केली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ट्रेस, टेस्ट अँड ट्रीट करण्यावर जोर देण्यात यावा असंही सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या नियमांचं सक्तीनं पालन करावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

“आपल्या करिअरचं काही सांगता येत नाही, सेव्हिंग्स पाहिजेच”

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ‘एवढे’ लाख नागरिक बाधित होतील; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला अंदाज

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला पंतप्रधानांची फक्त 3 मिनिटांची हजेरी; विरोधक आक्रमक

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

राहुल-दिशाच्या लग्नानंतर आता राखी म्हणतेय, ‘पुढच्या वर्षी माझ्या लग्नाला यायचं’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More