फक्त प्रकाश आंबेडकरांचा पराभव होऊ द्या; भाजपचे एकही कार्यालय ठेवणार नाही- भीम आर्मी

फक्त प्रकाश आंबेडकरांचा पराभव होऊ द्या; भाजपचे एकही कार्यालय ठेवणार नाही- भीम आर्मी

सोलापुर |  सोलापुरातून फक्त प्रकाश आंबेडकारांचा पराभव होऊ द्या… राज्यात भाजपचे एकही कार्यालय ठेवणार नाही, अशी धमकीच भीम आर्मीने दिली आहे. एवढंच नाही तर राज्यात भाजपच्या नेत्यांना फिरकूही देणार नाही, असंही भीम आर्मीने म्हटलं आहे.

महाराष्ट्र भीम आर्मीचे प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी पत्रकाद्वारे त्यांची भूमिका जाहीर केली आहे.  प्रकाश आंबेडकर यांनी इव्हीएममध्ये घोळ झाला नाही तर आमचे सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागा निवडून येतील, असा दावा केला आहे.

सोलापुरातून वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे तर भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

दरम्यान, भीम आर्मीच्या या इशाऱ्यावर भाजप काय भूमिका घेतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला; अजित पवारांनी सांगितलं कारण

-निकालाच्या एक दिवस आधी अमित शहांनी विरोधकांना विचारले हे 6 प्रश्न!

-उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कन्हैया कुमारने लिहिली फेसबुक पोस्ट

-वैर विसरून आम्ही पुढे आलो आहोत; भुजबळांची राज ठाकरेंवर स्तुतीसुमने

-क्षीरसागरांनी पक्ष सोडल्याने मला दुख: होत आहे- छगन भुजबळ

Google+ Linkedin