बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भरतासारख्या भावावर फक्त रामच प्रेम करू शकतात, आपण ते करू शकत नाही”

नवी दिल्ली | देशाच्या राजकारणात नेहमीच भुतकाळात विकास झाला की नाही हा वाद रंगलेला आपण पाहिला आहे. आताही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला आहे. मोहन भागवत दिल्लीत विज्ञान भवनातील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशाच्या 75 वर्षातील वाटचालीवर भाष्य केलं आहे. परिणामी आता भागवत यांच्या वक्तव्यांनी देशातील राजकारणात रंगत आणली आहे.

75 वर्षात देशाची म्हणवी तितकी प्रगती झाली नसल्याचं वक्तव्य भागवत यांनी केलं आहे. देशाला प्रगती करायची असले तर नवीन मार्गानं जावं लागणार आहे. त्याच मार्गानं गेलोत तर देशाची प्रगती होणार नाही, असं वक्तव्य भागवत यांनी केलं आहे. परिणामी भागवत यांच्या या वक्तव्यावरून देशात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भागवत यांनी आपल्या भाषणादरम्यान प्रभु रामाचादेखील दाखला दिला आहे.

आपण भगवान श्रीरामाचा नारा जोरात लावतो पण आपण त्यांचं किती गुण आत्मसात करतो ते महत्त्वाचं आहे. भरतासारख्या भावावर फक्त रामच प्रेम करू शकतात आपण ते करू शकत नाही, असंही मोहन भागवत म्हणाले आहेत. जगातील सर्वात जास्त महापुरूष आपल्या भारतात घडले आहेत. हे आपल्या सर्वांचं नशीब आहे, असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, स्वार्थ सोडला तर आपण सुद्धा प्रभु रामाच्या मार्गावर जाणार आहोत. स्वार्थपणासोडू न सामान्य माणसांच्या भल्यासाठी काम करणं अवघड आहे. विज्ञान भवनात आयोजित संत ईश्वर पुरस्काराचं वितरण भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या 

अखेर काँग्रेसच्या प्रयत्नांना यश, भाजपने निवडणुकीत दिला काँग्रेसला हात

वानखेडे-मलिक वादात आता नवाब मलिकांच्या दोन्ही मुलींची उडी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस

“रझा अकादमी कोणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे”

“महापुरास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप न केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More