बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही ज्या मुख्यमंत्र्याची जात काढली, त्याच मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षण दिलं”

औरंगाबाद | आरक्षण हा आपल्या व्यवस्थेतील काय चर्चेत असलेला विषय आहे. आरक्षणावरच आपल्याकडे राजकीय गणितं बनतात आणि बिघडतात. परिणामी कोणत्याही सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन झालेलं परवडत नाही. सध्या सुद्धा राज्यात मराठा आरक्षण तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अशातच राज्याच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

मराठा आरक्षण देण्याचं काम आमच्याच सरकारच्या काळात झालं, असं सांगताना पंकजा मुंडे यांनी सत्ताधारी नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. तुम्ही ज्या मुख्यमंत्र्यांची दररोज जात काढता त्यांनीच मराठा आरक्षण दिलं आहे, असं सांगत मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं असल्याचंही पंकजा यावेळी म्हणाल्या.

आता एक नवीनच षड्यंत्र चालू झालं आहे. बहुजनांची व्याख्या खराब करण्याचं षड्यंत्र चालू झाल्याची खंतही पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलून दाखवली. इकडं ओबीसी आरक्षणाचा मुद्दा काढला की तिकडं कोणतरी मराठा आरक्षणाचा मुद्दा मुद्दाम काढतो. अरे मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं कामही तुम्हीच केलंय, अशी जहरी टीका सुद्धा त्यांनी केली.

दरम्यान, पंकजा मुंडे औरंगाबादमध्ये भाजप ओबीसी मोर्चाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीवर खरमरीत टीका केली. ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं नाही तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना यावेळी दिला.

थोडक्यात बातम्या 

रवी राणांची आमदारकी जाणार?, रवी राणा म्हणतात…

…जेव्हा नितीन गडकरी सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे राहतात; पाहा व्हिडीओ

अजित पवारांच्या आदेशानंतरही महाविद्यालयं उघडली नाहीत, कारण…

“वारकरी सांप्रदायाचा पाठिंबा म्हणजे साक्षात विठोबा-रखमाईचे आशीर्वादच”

“आई-वडिलांनी बिग बॅासमध्ये जाऊ नको म्हणून सांगितलं होतं, पण…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More