बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तरच कर्मचाऱ्यांना पगार वाढ मिळणार’; अनिल परब यांचा गंभीर इशारा

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांच्या (S.T. Worker) तीव्र संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला होता. त्यानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू झालेले पहायला मिळाले. मात्र अद्यापही विलिणीकरणाच्या मागणीवरुन अनेक ठिकाणी आंदोलन सुरुच आहे. अशातच आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी कर्मचाऱ्यांना आणखी एक इशारा दिला आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे. मात्र सरकारनं अजून कर्मचाऱ्यांची विलिणाकरणाची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अतिशय तीव्र आंदोलन केलेलं पहायला मिळालं. मात्र आता कामावरुन काढण्याच्या भीतीमुळे हळूहळू कर्माचारी कामावर रुजू होत आहेत. यातच कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनाच फक्त पगार मिळणार असल्याचा गंभीर इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.

जे कर्मचारी कामावर हजर आहेत, त्यांनाच मंगळवारी वेतन देण्यात येईल, असे सूचक वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. त्यामुळे आज कामावर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोमवारी 250 आगारांपैकी 105 आगारातून वाहतूक सुरू झाली आहे, तर 145 आगार अद्यापही बंदच आहेत.

थोडक्यात बातम्या – 

चिंताजनक! Omicron मुळे ‘या’ महिन्यात येणार देशात तिसरी लाट?

पुण्याला हादरवणाऱ्या गोल्डनमॅन समीर मसूर हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई!

‘मेरे उतने बिग बूब्स नही जो मे…’; नीना गुप्तांचा जुना व्हिडीओ व्हायरल

“श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही असं ठरवलंंय”

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ?, वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More