भाजपची मोठी रणनीती; फक्त ‘या’ नेत्यांनाच मंत्रिमंडळात संधी मिळणार?

BJP | महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता शपथविधीची तयारी सुरु झाल्याची माहिती समोर येते आहे. मुख्यमंत्री भाजपचा असणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्याआधी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भाजप (BJP) मंत्रिमंडळासाठी नवा नियम आणत असल्याचं बोललं जात आहे.

‘या’ नेत्यांनाच मंत्रिमंडळात मिळणार संधी

भाजपच्या (BJP) नव्या नियमामुळे भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना मोठा फटका बसू शकतो. कारण फक्त भाजप 50 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

शिंदे सरकारमधील मंत्री असणारे किंवा काही ज्येष्ठ भाजप नेते मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु भाजपने लावलेल्या निकषाचे पालन केल्यास 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना फटका बसू शकतो.

भाजपने खासदारकीसाठी कठोर निर्णय घेतले होते. काही जणांना खासदारकी गमवावी लागली. लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्या सारख्या पक्षाची उभारणी करणाऱ्या ज्येष्ठ सदस्यांना राजकीय निवृत्ती घ्यावी लागली. संसदेत 75 वयाचा निकष भाजपने ठेवला होता. आता राज्य पातळीवर नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

ब्रेकिंग! PM मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आलेल्या कॉलने खळबळ

गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, चांदीतही तब्बल 10 हजारांची घसरण?; जाणून घ्या दर

पराभव जिव्हारी लागला, शहाजीबापू पाटलांची मोठी घोषणा!

विनोद तावडेंचं ‘राजकीय वजन’ वाढणार, भाजपकडून मोठी जबाबदारी

आधी डिलीट केलं ट्विट, आता म्हणतात बाबा तुमचा अभिमान वाटतो!