बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी गेलेल्या मंत्र्यांनाच पडली मदतीची गरज, पाहा व्हिडीओ

भोपाळ | गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. अनेक राज्यांमध्ये या पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमुळे अनेकांची घरं पाण्याखाली गेली. अनेकांना आपला जीव गमावला लागला आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. अशातच आता पूरग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी गेलेल्या मंत्र्यांनाच मदतीची गरज पडल्याची घटना समोर येत आहेत.

मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे नेते नरोत्तम मिश्रा हे दातिया भागातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी सिंध नदीच्या पूरामध्ये अडकलेल्या नऊ लोकांची मदत केली. गावाकडे पलायन करताना मिश्रा यांनी बोटीची मदत घेतली होती. मात्र गावाला सगळीकडून पाण्यानं वेढा असल्यानं त्यांचं गावाच्या बाहेर येणं कठिण होऊन गेलं. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी थेट हेलिकॉप्टरच बोलवावं लागलं.

नरोत्तम मिश्रा यांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरमधून सोडलेल्या दोरीला पकडून त्यांना वर खेचावं लागलं. अशा प्रकारे त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करावं लागल्याचा हा सर्व प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. अनेकांनी तर नरोत्तम मिश्रावर संताप व्यक्त केला आहे. पहिलेच संकट कमी आहे का यात तुम्ही तिकडे जाऊन अजून अडचणी वाढवण्याचं काम करत आहात, असाही प्रश्न त्यांना केला जात आहे. यातच ज्या ज्या भागात लोकांना पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी सरकारकडून मदतीचं आवाहन करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या –

अबब! प्रियांकाच्या अमेरिकेतील रेस्टॉरंटमधील मुंबई वडापावची किंमत ऐकून थक्क व्हाल

गरीब घरातला श्रीमंत माणूस; नाव न सांगण्याच्या अटीवर पांडुरंगाचरणी 1 कोटींचं दान!

’15 दिवस धोक्याचे’; केंद्राकडून राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना

41 वर्षांनंतर हाॅकी संघानं रचला इतिहास; रोमांचक सामन्यात भारताचा दणदणीत विजय

मी चुकीचा होतो तर, केंद्रावर ही वेळ का आली?- अशोक चव्हाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More