बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”ज्यांच्या भावना नालायक असतात, तेच नालायकासारखं बोलतात”

बुलढाणा | राज्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राज्यातील या अत्याचारांच्या घटनांना सरकार जबाबदार आहे. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वादग्रस्त वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं होतं. दरेकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आता शिवसेनेने प्रविण दरेकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

प्रविण दरेकरांच्या याच वादग्रस्त वक्तव्याचा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी समाचार घेतला आहे. ज्या लोकांच्या भावना नालायका सारख्या असतात, तेच लोक नालायका सारखं बोलत असतात. त्या लोकांना चांगलं बोलता येत नाही. तसेच प्रवीण दरेकरांच्या बोलण्यात कितपत तथ्य असतं, हे राज्यातील जनतेला ठाऊक आहे, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

महिलांवर अत्याचाराच्या घडलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. अशा घटना महाराष्ट्रात घडायला नको होत्या, अशा भावना सत्तारांनी व्यक्त केल्या आहेत. राज्यात नुकतीच घडलेली निर्भयाची घटना ही जलदगतीने न्यायालयात चालावण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. तसेच निर्भयाच्या कुटूंबाची जबाबदारी देखील उचलली आहे, असं सत्तार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. या नुकसानीचा पाहणी दौरा सत्तार करत होते. नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या –

आयपीलमध्ये RCB दिसणार ‘या’ नव्या जर्सीत; कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!

“बार्टीला नियमित निधी द्या, अन्यथा…”; भाजपच्या सुनील माने यांचा इशारा

काय सांगता! हाताला काम नसल्यानं तरूणांनी सुरू केला चक्क नोटांचा छापखाना

मोठी बातमी! याॅकर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

बाप्पासोबत लाखो रुपयांच्या मुकूटाचंही पाण्यात विसर्जन, लक्षात आल्यानंतर….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More