बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फक्त दोन षटकार आणि कायरन पोलार्डच्या नावावर होणार ‘हा’ जबरदस्त विश्वविक्रम!

चेन्नई | इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या पहिल्या हंगामाचा सामना मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या रंगणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज कायरन पोलार्ड आपल्या नावे एक विक्रम करण्याच्या तयारीत आहे. कायरन पोलार्ड आयपीएलच्या इतिहासात 200 षटकार लगावणारा खेळाडू म्हणून विक्रम करण्यासाठी सज्ज आहे. केवळ दोन षटकार आणि हा विक्रम पोलार्ड आपल्या नावे करु शकतो.

कायरन पोलार्ड 2010 मध्ये पदार्पण केल्यापासूनच मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. पोलार्डने आतापर्यंत 164 आयपीएल सामने खेळले आहेत. 164 सामन्यांच्या 147 डावांत पोलार्डने 198 षटकार लगावले आहेत. आरसीबीच्या विरोधात खेळलेल्या सामन्यात दोन षटकार लगावून पोलार्डकडे आयपीएलमधील 200 षटकार लगावण्याचा बहुमान मिळवण्याची संधी आहे.

कायरन पोलार्ड आयपीएलमध्ये 200 षटकार लगावण्याचा विक्रम रचणारा पहिला खेळाडू नसणार, तर यापूर्वीही अनेक खेळाडूंनी हा विक्रम आपल्या नावे केला आहे. पोलार्डपूर्वी 5 फलंदाजांनी आयपीएलमध्ये 200 हून अधिक षटकार लगावण्याचा विक्रम रचला आहे. सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण 349 षटकार लगावले आहेत.

दरम्यान, आयपीएलमध्ये पोलार्डचा रेकॉर्ड उत्तम राहिला आहे. पोलार्डने 147 डावांमध्ये जवळपास 30 च्या सरासरीने 150 च्या स्ट्राइक रेटने 3023 धावा केल्या आहेत. पोलार्डने आयपीएलमध्ये 15 अर्धशतकं लगावली आहेत. त्याचा सर्वाधिक स्कोअर 83 धावांचा आहे. फलंदाजी व्यतिरिक्त पोलार्डने महत्त्वाच्या क्षणी मुबंई इंडियन्ससाठी गोलंदाजी करत महत्त्वाची भूमिकाही निभावली आहे. पोलार्डने आयपीएलच्या 92 डावांत गोलंदाजी करत 60 विकेट्स घेतल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

केंद्र सरकारच्या पाया पडायला लागलं तरी चालेल पण…- जितेंद्र आव्हाड

मोठी बातमी! राज्य सरकारचा मोठा निर्णय; MPSC परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्रात इतक्या आठवड्याचा लॅाकडाऊन?; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं मोठं वक्तव्य

“लस आहे पण देण्याची ऑर्डर नाही, कोरोनाकाळातील अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकारने….”

“लस उत्सव साजरा करण्यासाठी आधी लस तरी उपलब्ध करून द्या” – जयंत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More