बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यातील रुग्णालयांना महत्त्वपूर्ण आदेश; आता फक्त ‘या’ कारणासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर

पुणे | रेमडेसिवीर इंजेक्शनच्या अतिवापरामुळे कोरोना रुग्णांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या पाहता आता पुण्यातील रुग्णालयांना महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आले आहेत. कोरोना रूग्णाला अगदीच गरज असेल तरच या इंजेक्शनचा वापर करावा, असं जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलं आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे नसतील किंवा त्याला रेमडेसिवीरची एलर्जी असेल तर त्यांना इंजेक्शन देऊ नये.

कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या आणि एखादा अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठीही रेमडेसिवीरचा वापर टाळावा. तर, कोणत्याही रुग्णालयाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्यासाठी नातेवाईकांना प्रिस्क्रिप्शन देऊ नये. गरजू रुग्णांनाच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जावे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित रुग्णालयाचा रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा रोखण्यात येईल, असा इशाराही पुणे महानगरपालिकेने दिला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना विषाणूची लागण होण्याचा धोका ओळखून पुणे महानगरपालिकेने युद्धपातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी आता बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात लहान मुलांसाठी 50 बेडचा स्वतंत्र कक्ष उभारण्याचं काम सुरु आहे. त्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी निधी दिला आहे.

दरम्यान, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालयांना बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा, सुविधा निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत. लहान मुलं कोरोनाने बाधित झाल्यास त्यांच्यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र केंद्र तयार करण्याबाबत विचार करावा. तर कोविडनंतर उद्भवणाऱ्या आजाराबाबतही दक्ष राहावे, असे सौरभ राव यांनी सांगितले आहे.

थोडक्यात बातम्या

‘संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा’; काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांंना पत्र

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

अबब… ‘या’ तरुणीला कोरोना लसीचे तब्बल 6 डोस एकाच वेळी दिले, त्यानंतर…

कोविशिल्डनंतर आता ‘या’ लसीची निर्मिती महाराष्ट्रात होणार

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पोलिसांचा आक्रमक पवित्रा; नियम न पाळल्यास दांडुक्याचा होणार वापर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More