वाॅशिंग्टन | ‘गुगल’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची ‘अल्फाबेट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे.
नवीन जबाबदारीबाबत आपण उत्सुक आहोत. तंत्रज्ञानाची मदत घेऊन अनेक आव्हानावर मात करण्यावर आपला भर राहील, असं सुंदर पिचाई यांनी सांगितलं आहे.
अल्फाबेट ही कंपनी आता चांगली प्रस्थापित झालेली असून ‘गुगल’ आणि ‘अदर बेटस’ या दोन कंपन्याही चांगलं काम करत आहेत. त्यामुळे व्यवस्थापन रचना अधिक सुलभ करण्याची गरज आहे, असं गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष या पदावरून पायउतार झालेल्या लॅरी पेज आणि सर्जेई ब्रिन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पिचाई हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एका शक्तिशाली पदावर पोहोचले आहेत. ड्रोन, इंटरनेट बिमिंग बलून, जाहिराती, स्मार्टफोन सॉफ्टवेअर, नकाशे, ऑनलाइन व्हीडिओ या सर्व सेवांची सूत्रं त्यांच्या हातात असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
…तर शीख दंगली झाल्या नसत्या- मनमोहन सिंग- https://t.co/7CFAtTGP2B @manm0hansingh
— थोडक्यात (@thodkyaat) December 5, 2019
बारावीच्या मार्कशीटवरुन ‘नापास’ शेरा हद्दपार!- https://t.co/L3XIUHFw8X #म
— थोडक्यात (@thodkyaat) December 5, 2019
आम्हाला महाराष्ट्राची काळजी आहे; चालू प्रकल्प बंद करणार नाही- जयंत पाटील https://t.co/8EMwOhBsrS @Jayant_R_Patil
— थोडक्यात (@thodkyaat) December 5, 2019
Comments are closed.