उघड्यावर शौचास बसाल तर पडेल 500 रुपयांचा दंड

मुंबई | राज्यात उघड्यावर शौचास बसलेलं आढळल्यास अशा व्यक्तीला 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. राज्य सरकारने काढलेल्या नव्या नियमावलीत याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

उघड्यावर शौचास बसण्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, लघवी करणे यावरही दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या शहर विकास विभागाने यासंदर्भात नियमावली जाहीर केलीय. 

कचरा फेकणाऱ्यास 150 ते 180 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यास 100 ते 150 रुपये तसेच सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्यास 100 ते 200 रुपयापर्यंतचा दंड आकारला जाणार आहे.