मनोरंजन

‘छपाक’ प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा; याचिकाकर्त्याला न्यायालयाने झापलं

Loading...

मुंबई | काही दिवसांपूर्वीच दीपिका पादूूकोणनं भूमिका साकारलेल्या ‘छपाक’ या चित्रपटाविरोधात एका लेखकाने मुंबई  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण याचिकाकर्त्यानं ही याचिका मागे घेतली आहे. यामुळे ‘छपाक’ चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

‘छपाक’ या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर चित्रपट प्रदर्शनावर स्थगिती आणण्यात आली होती, पण सत्य घटनेवर आधारित कथा कॉपी राईट कशी असू शकते? असा सवाल करत उच्च न्यायालयानं याचिका कर्त्याला जाब विचारला होता. यामुळे राकेश भारती यांना याचिका शेवटी मागे घ्यावी लागली आहे.

Loading...

लेखक राकेश भारतीनं ‘छपाक’ विरोधात दावा दाखल करत याचित्रपटाच्या कथेचं श्रेय मला द्यावं, अशी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण हा दावा उच्च न्यायालयानं फेटाळला आहे.

दरम्यान, या चित्रपटात प्रमुख भुमिकेत दीपिका पादूूकोणसह विक्रांत मैसी दिसणार आहे. हा चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या