बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलच्या पहिल्या सामन्याआधी कोहलीला मोठा फटका; संघाचा हा मोठा खेळाडू कोरोना पाॅझिटिव्ह

चेन्नई | आयपीएलच्या 14 व्या हंगामातील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात होणार आहे. चेन्नईच्या चेपाॅक मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. पण त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा फटका बसला आहे. बंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता कर्णधार विराट कोहली यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

देवदत्त पडिक्कल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाकडून सलामीचा फलंदाज म्हणून खेळतो. मागील वर्षी देवदत्तने आक्रमक फलंदाजी केली होती. देवदत्त कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने विराट कोहलीला एक नवा सलामीचा फलंदाज शोधावा लागेल. तर केरळच्या मोहम्मद अझुरूद्दीनची संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे. भारत इंग्लंड मालिकेनंतर आपण स्वतः सलामीला पडिक्कल सोबत येणार आहे असं, विराट कोहलीने सांगितलं होतं.

कोलकत्ता नाईट राईडर संघाचा नितीश राणा आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा अक्षर पटेल हे दोन खेळाडू कोरोना पाॅझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर देवदत्त पडिक्कल कोरोना पाॅझिटिव्ह सापडणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी वानखेडे स्टेडियमवरच्या 8 कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर 14 ब्रॉडकास्टिंग कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे.

दरम्यान, मागील वर्षी देवदत्तने आरसीबीकडून खेळताना सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 15 सामन्यात 31.53 च्या सरासरीने 473 धावा केल्या होत्या. तर आयपीएल मधला तो स्टार य खेळाडू ठरला होता. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्राॅफीत सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला होता.

थोडक्यात बातम्या-

आयपीएलवर कोरोनाचं सावट; आणखी 14 कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

आयपीएलआधीच शुभमन गिलचा ट्रेलर; 35 चेंडूत काढल्या एवढ्या धावा

गुगल प्ले स्टोअरमध्ये होणार ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

राज ठाकरेंनी जाहीर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केल्या ‘या’ 8 सूचना

महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय? राज ठाकरेंनी सांगितलं कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More