बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कर्नाटकात भाजपला मोठा धक्का; ‘ऑपरेशन लोटस’ची चौकशी होणार

बंगळूरू | दोन वर्षांपुर्वी 2019 मध्ये कर्नाटकच्या राजकारणात मोठी घटना घडली. काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार पाडून भाजपने कर्नाटकात सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने आमदार फोडल्याचा आरोप भाजपवर केला होता. त्यानंतर एक ऑडिओ क्लिप समोर आली होती. आता ऑपरेशन लोटसची चौकशी करण्याची परवानगी बंगळूरू उच्च न्यायालयाने दिली आहे. यामुळे कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

जेडीएसचे नेते नगन गौंडा यांचे चिरंजीव शरण गौंडा यांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केली होती. यावर ही एफआयआर रद्द करण्याची याचिका भाजपकडून करण्यात आली होती. परंतू न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली. आता या प्रकरणामुळे भाजपच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.

समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आमदाराच्या मुलाला येडियुरप्पा यांनी फोन करून तुझ्या वडिलांना पक्ष सोडायला सांग असं सांगतलं होतं. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर 2018 मध्ये स्थापन झालेलं काँग्रेस जेडीएसचं सरकार 2019 मध्ये भाजपने पाडलं आणि 2019 मध्ये येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

कर्नाटक विधानसभेच्या 225 जागेवर भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या तरीही त्यांना राज्यात सरकार स्थापन करता आलं नव्हतं. सरकार स्थापनेसाठी 9 आमदारांची गरज भाजपला असताना सत्ताधारी पक्षातील काही आमदार फुटले आणि त्यांनी भाजप सोबत हात मिळवणी केली होती.

थोडक्यात बातम्या-

आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार- तृप्ती देसाई

“शिवसेना मी घराघरात पोहोचवली, मीच स्वत: राजीनामा देणार होते”

“पवार साहेबांच्या तब्येतीसंदर्भात विकृत पोस्ट करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

उद्धव ठाकरेंना फोन करून नरेंद्र मोदींनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस!

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ‘हा’ निर्णय घेतला मागे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More