बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर 30 एप्रिलपर्यंत कोरोनाची साखळी तोडणं शक्य आहे”

मुंबई | कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जानेवारी पर्यंत कमी झालेली रूग्णसंख्या आता पुन्हा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात वाढायला लागली आहे. कोरोनाची पहिली लाट 9 महिने चालली, पण आता ही दुसरी लाट किती काळ चालेल अशी चिंता लोकांना लागली वाटू आहे. राज्यातील टास्क फोर्सचे सदस्य डाॅ. अविनाश सुपे यांनी काही उपाय केले तर, या महिन्याच्या अखेरीस पुन्हा चांगली परिस्थिती येऊ शकते, अशी सुखद माहिती दिली आहे.

सध्या राज्यात दुसरी लाट आली आहे. मात्र ही कोरोनाची साखळी येत्या 30 एप्रिलपर्यंत तोडता येऊ शकते, त्यासाठी राज्यात मिनी लाॅकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावायला हवेत, असं मत डाॅ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केलं आहे.

राज्यात सध्या कडक लाॅकडाऊनची गरज आहे. तर रेल्वे सेवांमध्ये देखील बदल करण्याची गरज आहे. राज्यात मृत्यूदर कमी झाला आहे. पण काही ठिकाणी मुत्यूदर वाढला आहे. सर्वांनी लस घेणं महत्वाचं आहे. लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असं नाही. 30% लोकांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता आहे, असं डाॅ.सुपे म्हणाले.

दरम्यान, कोरोना प्रतिबंधनात्मक लस आणि मुत्यूचा काहीही संबंध नाही. लस घेण्याआधी असलेल्या व्याधी डाॅक्टरांना सांगाव्यात. डाॅक्टरांच्या सल्यानुसार लस घ्यावी. ताप येणं, अंग दुखणं, हात दुखणं हे लस घेल्यानंतर होणार आहेत परंतू लस घेतल्याने कोणाचा मृत्यू झाला नाही, असं सुपे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“माझे कुटुंब माझा जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत”

सचिन वाझे यांच्या प्रकृतीला धोका, वैद्यकीय तपासणीत ‘ही’ धक्कादायक बाब उघड

भारताच्या हद्दीत चुकून घुसला पाकिस्तानी मुलगा, त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल!

‘तुमचं वजन वापरून बघा काय मिळतंय का?’; आव्हाडांचा फडणवीसांना टोला

बोंबला! बॉयफ्रेन्डची हत्या करून वडिलांसोबत केलं लग्न, प्लॅन करून तिघांनी केला त्याचा खात्मा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More