विरोधक आक्रमक; कांद्यांची माळ घेऊन विधानभवनाबाहेर केली घोषणाबाजी
मुंबई | विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session) आजचा दुसरा दिवस आहे.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाला. कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच जोरदार घोषणाबाजी सुरु केली.
विशेष म्हणजे विरोधकांनी यावेळी गळ्यात कांदा आणि कापसाच्या माळा घातल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेतकरी विरोधी सरकारचा विरोध असो, असे बॅनरही यावेळी विरोधकांनी झळकावले.
पायऱ्यांवर निदर्शने करणाऱ्या विरोधी पक्षांच्या आमदारांनी कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांना कांद्याची माळ दिली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.
विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनोखी वेशभूषा केली. त्यांनीदेखील गळ्यात कांद्याची माळ घातली होती. तसेच डोक्यावर कांद्याचं टोपलं घेऊनच ते फिरू लागले. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव दिला नाही तर सरकारला कांद्यासारखं सोलून काढू, असा कठोर इशारा त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.