औरंगाबाद | राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे येत्या 8 जून रोजी सभा होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथील पहिलीच सभा असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोलिसांनी काही अटी आणि शर्तींसह परवानगी दिली आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंच्या सभेवरून शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेला किती लोक येतील कसे बसतील याची चिंता आम्हाला नाही. सभेची गर्दी विरोधकांना मोजत बसावी लागेल. या सभेला येणारे लोक आमच्या शुभचिंतकांनी मोजत बसावे, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे. तसेच मैदानचं नाही तर शहरातही जागा उरणार नाही, एवढे लोक येतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा 8 जून 1985 रोजी स्थापन झाली होती. सदर शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून कलगीतुरा रंगलेला असताना मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी शिवसैनिक आणि पदाधिकारी विविध ठिकाणी नागरिकांना निमंत्रण देत आहेत. सभेच्या निमित्ताने लोकांच्या घरी जाण्याची आणि भेटण्याची संधी आहे, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय स्तरावरील नेते आहेत. मात्र, फडणवीस हे व्यथित झालेले नेते आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“कोरोनाच्या काळातही भारत थांबला नाही, देशाने आपल्या सुधारणांचा वेग वाढवला”
“…यांचं वागणं बघून हनुमानानेही कपाळावर हात मारून घेतला असेल”
“औरंगाबाद आणि उस्मानाबादची नवी नावं कधीही घोषित होतील”
राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ; केंद्राने महाराष्ट्राला दिल्या ‘या’ सूचना
“चार वर्षे झाली राहुल गांधी यांची भेटण्यासाठी वेळ मिळाली नाही”
Comments are closed.