बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फिरसे मौका मौका! भारत-पाकिस्तान सामन्याच्या प्रोमोची तुफान चर्चा; पाहा व्हिडीओ

मुंबई | क्रिकेट म्हणजे भारतात एक प्रकारचा उत्सवच असतो आणि त्यात भारत आणि पाकिस्तान यांचा सामना असेल तर ‘सोने पे सुहागा’. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना पाहायची संधी गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटप्रेमींना क्वचितच मिळाली. त्यातच आता पुन्हा ‘फिरसे मौका मौका’ म्हणण्याची संधी मिळणार आहे. कारण येत्या 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात पारंपारिक लढत होणार आहे.

भारत पाकिस्तान सामन्याची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जातो. त्यावेळी स्टार स्पोर्ट्स या सामन्यासाठी खास प्रोमो करते. आता या दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने येणार असल्यानं स्टार स्पोर्ट्सने या सामन्यासाठी नवीन प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोची मथळा यावेळीस देखील मौका मौका तयार करण्यात आला आहे.

‘नवा मौका मौका, नवी ऑफर, एक खरेदी करा एक मोफत मिळवा’, असं ट्वीट करत स्टार स्पोर्टने प्रोमो रिलीज केलाय. त्याचबरोबर तुम्ही भारत पाकिस्तान सामन्यासाठी तयार आहात ना, असंही स्टार स्पोर्ट्सने लिहिलं आहे. 2015 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा मौका मौकाची थीम प्रसिद्ध करण्यात आली होती.

दरम्यान, आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेला 17 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. विश्वचषक सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर 24 तारखेला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाणार आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

‘शरद पवार 4 वेळी मुख्यमंत्री होते पण…’; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

मोठी बातमी! माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्स रूग्णालयात दाखल

“शरद पवारांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही?”

“सात दिवस झालं टोटल सुरु मात्र हिशोब लागत नाहीये”

‘त्या रात्री आर्यन क्रुझवर उपस्थित नव्हताच’; आर्यनच्या वकिलांचा खळबळजनक दावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More