बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता स्वस्त किंमतीत सोन्यात गुंतवणूक करा; केंद्र सरकारची मोठी योजना

नवी दिल्ली | केंद्र सरकारने सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. भारतातील काही ग्राहक गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं खरेदी करण्याचा विचार करत असतात. त्यांच्यासाठी केंद्र सरकारची शासकीय सुवर्ण योजना पुन्हा एकदा सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत परवडणाऱ्या किंमतीत ग्राहकांना गोल्ड बॉण्ड खरेदी करता येणार आहेत.

सध्या भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सोन्याच्या रोख्यांची किंमत 4 हजार 732 रूपये प्रति ग्रॅम ठेवली आहे. त्याचसोबत भारतातील जे गुंतवणूकदार ऑनलाईन अर्ज करतात आणि डिजीटल पद्धतीने पैसे देतात, त्यांना सोन्याच्या रोख्यांवर 50 रूपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. अशा गुंतवणुकदारांसाठी गोल्ड बॉण्डची किंमत 4 हजार 682 रूपये ग्रॅम असणार आहे.

30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत अर्जांसाठी बाॅंड खुले राहणार असल्याचं आरबीआयने सांगितलं आहे. याआधी मे 2021 ते 2021 सप्टेंबर दरम्यानच्या सहा हप्त्यांमध्ये शासकीय सुवर्ण रोखे केंद्र सरकारने जारी केली होती. त्यामुळे आता ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत गोल्ड बाॅण्ड खरेदी करता येऊ शकेल.

दरम्यान, या योजनेसाठी ग्राहकांना किमान एक ग्रॅम सुवर्ण रोखे खरेदी करावे लागणार आहे. रोखे खरेदी करण्याची कमाल मर्यादा 4 किलो आहे. तर योजनेचा फायदा मिळवण्यासाठी कमाल कालीवधी 8 वर्ष असणार आहे. त्याचबरोबर पाचव्या वर्षानंतर त्यातून बाहेर पडण्याचा पर्याय देखील या योजनेत उपलब्ध करून दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील’; तालिबानचं अफगाणी नागरिकांना नवं फर्मान

जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू – निलेश राणे

राजनाथ सिंह यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा अमोल कोल्हेंनी घेतला समाचार

मोठी बातमी! नारायण राणेंना बसला वीजेचा शॅाक

“मी ठाकरे… माझ्या डीएनएमध्ये राजकारण आहे हे त्यांनी दाखवून दिलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More