सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोह नव्हे- विधी आयोग

नवी दिल्ली | सरकारच्या विद्यमान धोरणांशी विचार जुळत नसतील तर त्या व्यक्तींवर देशद्रोहाचा आरोप लावता येणार नाही, असं मत विधी आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती बी. एस. चौहान यांच्या नेतृत्वाखाली आयोग कार्यरत आहे.

लोकांना त्यांच्या पद्धतीने देशप्रेम व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. भारतीय दंड विधानांतर्गत राष्ट्रद्रोह कायदा (124 अ)वर आलेल्या सूचना पत्रातून अनेक मुद्दे पुढे ठेवण्यात आले आहेत. यावर चर्चेची गरज असल्याचं आयोगाने सांगितलं आहे.

दरम्यान, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा उद्देश कायदा-सुव्यवस्था बिघडवणे किंवा अवैध मार्गाने सरकारला उलथवून टाकण्याचा असेल तेव्हाच राष्ट्रद्रोह कायद्याचा वापर करावा, असं आयोगाने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांचा एक आदेश आणि नाशिक भाजपला ‘जोर का झटका’!

-वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे प्राण वाचले!

-‘आत एक, बाहेर एक’; असं उद्धव ठाकरे वागत नाहीत- मुख्यमंत्री

-उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक!

-गौरी लंकेश हत्या प्रकरणी आणखी एकाला अटक; कर्नाटक एटीएसची कारवाई

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या