बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारी धोरणांना विरोध करणं म्हणजे देशद्रोह नाही- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | आजकाल कोणालाही देशद्रोही ठरवण्याचा ट्रेंड सुरु आहे. मागील 5-6 वर्षात सोशल मीडियावरून सरकारविरोधी काही वक्तव्य केलं तर देशद्रोहाचा ठपका ठेवला जात होता. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मोठं भाष्य केलं आहे.

फारूक अब्दुल्ला यांच्याविरोधात रजत शर्मा नावाच्या एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी दरम्यान सरकारी धोरणांना विरोध करणे किंवा आक्षेप घेणं हा देशद्रोह असू शकत नाह, असं भाष्य सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे. याच प्रकरणात कोर्टाचा वेळ वाया गेला त्यामुळे याचिका कर्त्याला 50 हजाराचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे.

पूर्व लडाक परिसरात भारत आणि चीन यांच्यात चालू असलेला संघर्ष हा जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम काढण्यात आल्याचा परिणाम आहे. चीन सरकारने याचा पूर्वीपासूनच विरोध केला होता. सीमेवरील चीनचं आक्रमक धोरण हा मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे अशी टीका फारूक अब्दुल्ला यांनी केली होती. त्यानंतर त्यांना भाजप नेत्यांनी त्यांना देशद्रोही म्हणत त्यांच्यावर टीका केली होती.

फारूक अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत रजत शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. फारूक अब्दुल्ला यांना चीन आणि पाकिस्तान मधून पैसे मिळतात, असा दावा या याचिकेत केला होता. मात्र याबद्दल कोणतेही पुरावे शर्मा यांना न्यायालयात सादर करता आले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. त्याचबरोबर न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याने शर्मा यांना 50 हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे.

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल चोरांचा थेट पाईपलाईनवर डल्ला; पेट्रोलनं दोन विहिरी भरल्यानं महाराष्ट्रात खळबळ

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ बड्या टोळीच्या म्होरक्याला केलं अटक

देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; ‘या’ कामात घोटाळा झाला का? होणार चौकशी

बिपाशा बासूचा हॉट अंदाज; नवऱ्याला म्हणाली ‘जळतंय माकडं’; पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात 10 जणांचा मृत्यू, 995 पॉझिटिव्ह!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More