बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राठोडांना विरोध केला तर परिणाम भोगावे लागतील”

यवतमाळ |  शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वन मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच या सर्व प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारही मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याचं दिसून आलं. राजीनाम्यानंतर काही काळ संजय राठोड राजकीय वर्तुळातून बाहेर होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. सरकारमध्ये अशा धडाडीच्या लोकांची गरज आहे. त्यामुळे राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार, असं वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं होतं.

संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असेल तर राज्यभरात आंदोलनं करु, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता पोहरादेवी संस्थानाचे महंत सुनील महाराज यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. ‘संजय राठोड यांच्यावरील कोणतेच आरोप सिद्ध झाले नाहीत. तीन महिने उलटून गेले तरीही राठोड यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल नाही. मग तरीही चंद्रकांतदादा पाटील कोणाविरुद्ध आंदोलन करणार आहेत?’, असा सवाल महंत सुनील महाराज यांनी उपस्थित केला आहे.

‘भाजपचं आंदोलन बंजारा समाजाविरुद्ध आहे का? असं असेल येणाऱ्या काळात बंजारा समाजच भाजपला उत्तर देईल, याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील’, असंही महंत सुनील महाराज यांनी म्हटलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी वन मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पण आता त्यांनी मंत्रिपद देण्यात येणार असल्याच्या चर्चेमुळे भाजप पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

थोडक्यात बातम्या-

कोरोना झाल्यानंतर पडतंय टक्कल? वाचा लाँग कोविडचे साईडइफेक्ट

मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; विरोधी पक्ष नेत्यांनी केलं स्पष्ट

“मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज पंकजाताई आहेत”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

‘महाराष्ट्र सरकारने राज्याला कोरोनाची राजधानी केलं’, आशिष शेलारांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचं ‘हे’ प्रत्यूत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More