बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेचे सोशल मीडियावर पेड ट्रोलर आहेत; फडणवीसांचा दावा

मुंबई | शिवसेनेचे सोशल मीडियावर पेड ट्रोलर आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच सोशल मीडियाचा वापर शिवसेनेतर्फे खोटं चित्र रंगवण्यासाठी केला जातो आहे, असा आरोप फडणवीसांनी केला आहे. एका वेबसाईटशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

देशात एकूण रूग्णांपैकी 37 टक्के रूग्ण एकट्या महाराष्ट्राचे आहेत. तर देशातल्या अ‌ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 41 टक्के रूग्ण हे महाराष्ट्राचे आहे. यावरून महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर आणि भयावह आहे हे लक्षात येतं, असं फडणवीस म्हणाले.

सुरूवातीच्या काळात जेव्हा कोरोना रूग्ण सापडत होते त्यावेळी सरकारने काय केलं तर सेलिब्रेटींकडून आपल्या कौतुकाचे लेख लिहून घेतले. शेवटी विरोधी पक्षाचं आणि माध्यमांचं सरकारला आरसा दाखवणं हे कामच असतं. मग आता टीका सुरू झाली तर त्यात वाईट वाटण्याचं काय कारण? असा प्रश्न फडणवीसांनी विचारला.

उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री केंद्रावर सातत्याने आरोप करत आहेत. कोरोनाविरोधातल्या लढ्याला निधी मिळत नाही, पीपीई कीट मिळत नाही मिळत नाही अश्या प्रकारचे आरोप ते सातत्याने करत आहेत. मग मी पत्रकार परिषद घेऊन त्यांना तोंडावर पाडणं गरजेचं होतं. मी केंद्राने किती पीपीई कीट दिले याची आकडेवारीच जाहीर केली तसंच शेलारांनी देखील ट्विट करून महाविकास आघाडीतल्या नेत्यांना तोंडावर पाडलं. सरकारमधील मंत्री आणि नेत्यांचं खोटं बोल पण रेटून बोल असं वर्तन सुरू असल्याची टीका फडणवीसांनी केली.

ट्रेंडिंग बातम्या-

“मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 342 कोटी रुपये जमा, केवळ 7 टक्के रक्कम आरोग्य सुविधांसाठी खर्च”

कोरोना योद्ध्यांवर हल्ले करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी खडसावलं, म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

रूग्णांचा दिलासा देण्यासाठी पीपीई कीट घालून मंत्री यशोमती ठाकूर थेट कोविड वॉर्डात!

…अन् मीच पास झालो अशी मला फिलिंग आली, राज्यमंत्री तनपुरेंचं विद्यार्थ्यांना खास पत्र

गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे श्रीमंतांचे सरकार आहे – प्रकाश आंबेडकर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More