बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत का? महाराष्ट्राचा बंगाल होऊ देऊ नका”

मुंंबई | राज्यात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुुरु आहे. विरोधकांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांना चांगलचं धारेवर धरलं आहे. आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पडळकर यांच्यावरील हल्ल्यावरून राज्य सरकारला काही प्रश्न विचारले.

आपल्या महाराष्ट्रात आता रक्षकच भक्षक झाले आहेत का? आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यााच कट रचण्यात राजकीय नेत्यांनी पोलिसांना सामिल केलं का? असे काही प्रश्न फडणवीसांनी सभागृहात विचारले आहे. याशिवाय संतप्त होऊन पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत का? असा घणाघातही फडणवीसांनी सभागृहात केला.

“पडळकरांच्या हल्ल्याची क्लिप बाहेर आली. तेव्हा पडळकरांवर हल्ला सुरु असताना पोलीसचं हल्ल्याची शुटीगं करत होते. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई तर केली नाहीचं उलट ते हल्ल्याची शुटींग काढत राहिले. शिवाय पडळकर आणि त्यांच्या भावावारच 307 लावण्यात आले,” अशी टीकाही यावेळी फडणवीसांनी केली आहे.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्यावर नोव्हेंबर महिन्यात हल्ला झाला होता. पडळकरांनी यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर टीकाही केली होती. शिवाय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केलेला हल्ला हा सुनियोजीत कट होता. असाही आरोप पडळकरांनी केला होता. यावरून विधानसभेत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

‘…तो कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’, विधानसभेत पुन्हा एकदा राडा

इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं राज्यपालांना झेपलं पाहिजे- संजय राऊत

“…तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते”

अधिवेशनात कोरोनाचा कहर, ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर

‘मोहनदास करमचंद गांधीनी सत्यानाश केला’; कालीचरण महाराजाचं संतापजनक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More