बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही सरकार पाडणार नाही, ज्यादिवशी सरकार पडेल त्यादिवशी…”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीका करत हे सरकार लवकरच पडणार, असा दावा केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकार पडणार असल्याचं म्हंटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अशातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. (Devendra Fadnavis big statement mahavikas aghadi govt)

भारताचा राजकीय इतिहास जर आपण पाहिला तर अशी सरकारं जास्त काळ टिकत नाहीत. अशी सरकारने अंतर्विरोधाने पडतात. ज्यावेळी अशी सरकारे पडतात, ती आज पडतील की उद्या पडतील काही सांगता येत नाही. त्यामुळे अशी सरकारी जास्त दिवस टिकत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

आम्ही सरकार पाडणार नाही हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय. ज्या दिवशी हे महाविकास आघाडीचं सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही राज्यात पर्यायी सरकार देऊ, असंही फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला देखील उधाण आलं आहे.

दरम्यान, विरोधी पक्ष म्हणून आम्ही चोख काम करतोय, त्यामुळे त्यांना चिमटे बसत आहेत. आम्ही जनतेची कामं केली. सरकार पडेल असं राणे, दरेकर म्हणतात असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यावेळी फडणवीसांनी काढता पाय घेत, तेच याचं उत्तर देऊ शकतात, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘ही’ मराठी अभिनेत्री का म्हणतेय?, हा ट्रॅप आहे यात अडकू नका

“मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि ते परत घरात दिसेनासे झाले”

नोकरी गमावलेल्यांना सरकार देणार भत्ता ‘ही’ आहे भन्नाट योजना

कंगणा पुन्हा प्रेमात?,मिठी मारलेला फोटो कुणाचा?, बड्या नेत्याच्या नावाची चर्चा

शार्दुल ठाकुरची पडली विकेट! साखरपुड्याचे फोटो आले समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More