बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर राज्य सरकारविरूद्ध आमचा संघर्ष सुरुच राहील – देवेंद्र फडणवीस

मुंबई | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले  आहेत. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. किरीट सोमय्या हे कोल्हापूरकडे निघाले आहेत. त्यानंतर किरीट सोमय्या यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर सोमय्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोमय्यांना पोलिसांनी स्थानबद्ध घटनेवरून फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पुर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरूद्ध आमचा संघर्ष सुरुच राहील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हसन मुश्रीफ यांच्या विरोध किरीट सोमय्यांनी दिल्लीतील प्राप्तीकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे महत्त्वाची कागदपत्रे सोपवली होती. त्याचबरोबर विदर्भातील एका मंत्र्यांचा गैरव्यवहार उघड करणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांच्या घरासमोर पोलिसांचा कडक पाहरा लावण्यात आला होता. त्यानंतर आता किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना झाले आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सतत निशाणा साधत आहेत. त्यामुळे सरकारमधील अनेक नेत्यांना ईडीच्या कार्यालयात देखील हजर राहावं लागलं होतं. किरीट सोमय्या पूढे काय भूमिका घेणार आहेत, ते आता पाहावं लागणार आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात  बातम्या- 

कोण आहेत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

‘…अन्यथा किरीट सोमय्यांना जन्माची अद्दल घडेल’; हसन मुश्रीफांचा पलटवार

‘किरीट सोमय्या आंतकवादी आहेत का?’; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

मोठी बातमी! कायरन पोलार्ड करणार मुंबईचं नेतृत्व; रोहित, हार्दिक संघाबाहेर

इवेन्ट ख़त्म! 17 सप्टेंबरच्या लसीकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More