बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे’; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई | सध्या भाजप विविध मुद्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. अलिकडेच वीजबिल थकबाकी वेळेवर वसूली झाली नाही तर राज्य अंधारात जाऊ शकतं, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात कोरोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक प्रत्येकजण अडचणीत सापडला आहे. त्यांना मदत करण्याच्या ऐवजी त्यांच्याकडून सरकार जबरदस्तीने वसूली करत आहे. महाविकास आघाडी सरकारला राज्यातील लोकांकडून सावकरासारखी वसुली करायची आहे, म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी  केली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात किती थकबाकी वाढली, हे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं आहे. यामधून जी काही थकबाकी दाखवतो, याच्यामध्ये कृषी पंपाच्या संदर्भात आपण क्रॉस सबसिडी करतो. त्यानंतर जो काही आपला तोटा झाला, हा भरून काढण्यासाठी आपल्याला जे टेरिफ मिळंतय, त्यामधून हा तोटा आपण भरून काढतो. त्यामुळे मला असं वाटंत की, या ठिकाणी जबरदस्ती वसूली करण्यासाठी हा सगळा बाऊ तयार करण्यात येतोय, असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान,  पोटनिवडणुका लागल्या आहेत तर आम्ही त्या निवडणुकीला सामोरं जाऊ. परंतु या सरकारमध्ये जे काही बोलत आहे. ते त्यांच्या कृतीत मात्र कुठेही काही दिसत नाही , हे यातून स्पष्ट दिसत आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

नाशकात पावसाचं थैमान! गंगापूर धरण ओव्हरफ्लो तर, गोदावरी नदीला पूर

पाकिस्तानचा नापाक डाव! देशात बाॅम्बस्फोट घडवण्याचा कट दिल्ली पोलिसांनी उधळला

आयपीलमध्ये RCB दिसणार ‘या’ नव्या जर्सीत; कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!

“बार्टीला नियमित निधी द्या, अन्यथा…”; भाजपच्या सुनील माने यांचा इशारा

काय सांगता! हाताला काम नसल्यानं तरूणांनी सुरू केला चक्क नोटांचा छापखाना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More