पणजी | गोव्यातील काँग्रेसमध्ये गोंधळ उडालेला कळतो आहे. काँग्रेस (INC) पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी गोवा काँग्रेससाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. गोवा विधानसभेच्या विरोधीपक्षनेते पदावरून मायकल लोबो (Michael Lobo) यांना पदावरुन हटविण्यात आले आहे. या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वत: कार्यभार स्वीकारला आहे.
गोव्यातील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी काँग्रेस नेते आणि खासदार मुकूल वासनिक (Mukul Vasnik) यांना गोव्याला पाठविले आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल (K C Venugopal) यांनी ट्विट करत ही माहिती दिली. तसेच गोवा प्रभारी गुंडू राव (Gundu Rao) यांनी पत्रकार परिषद घेऊन मायकल लोबो यांच्यार कारवाई केल्याची माहिती दिली. गोवा काँग्रेसचे नेते मायकल लोबो आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) हे भाजपसोबत संगनमत करुन पक्षाविरुद्ध कट रचत आहेत, असे गुंडू राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच लोबो आणि कामत यांच्यासोबत पक्षाच्या इतर तीन आमदारांसोबत संपर्क होऊ शकला नाही. गोव्याच्या 40 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये सामिल होण्याच्या तयारीत आहेत. लोबो आणि कामत तश्याप्रकारचे कट रचत होते, म्हणून पक्षाने त्यांच्याविरोधात कारवाईचा निर्णय घेतला आहे. गोव्यात काँग्रेसचे 11 आमदार आहेत.
पत्रकार परिषदेत राव म्हणाले, मायकल लोबो, दिगंबर कामत, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि डेलियाला लोबो यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. इतर आमदार पत्रकार परिषदेला उपस्थित होते. दुसरीकडे काँग्रेस आमदारांच्या भेटीगाटीबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून मला अनेक लोक भेटायला येतात. काँग्रेस आमदार मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नी प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना दिसल्या होत्या.
थोडक्यात बातम्या –
‘नामांतराविषयी आमच्याशी चर्चा झाली नाही’, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा
‘आज खऱ्या अर्थाने मी तणावमुक्त झालो’ -दिलीप वळसे पाटील
बंडखोर आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी नाही?, अत्यंत महत्त्वाची समोर
महाविकास आघाडी संदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार, बंडखोर आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी
Comments are closed.