बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट; रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणार का ?”

मुंबई |  राज्यात काही दिवसांपूर्वी लसीवरून राजकारण पेटलं होतं. केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार अशी टीका प्रतिटीका केली जात होती. यावरून पुढे आता रेमडेसिवीर इंजेक्शनावरून राजकारण पेटताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी वेलफेअर फंडच्यावतीने रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप केलं होतं. तर त्याआधी भाजपच्या गुजरातमधील पक्ष कार्यालयात रेमडेसिवीर इंजेक्शनाचा साठा आढळला होता. या प्रकरणावरून पुढे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी जोरदार पलटवार करत उत्तर दिलं आहे.

रेमडेसिवीर बाबत “आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट”, अशी भूमिका नवाब मलिक यांनी घेतल्याचं दिसून येत आहे. आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडिसिवीर चोरून आणले आहेत का? याबाबत नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण द्यावं, असं जोरदार पलटवार प्रविण दरेकर यांनी केला आहे. तुम्ही एवढे एवढेच निष्पक्ष असाल तर, रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणार का ? असा खोचक प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुडवडा असताना गुजरातमध्ये भाजप कार्यालयात हे इंजेक्शन दिलं जात आहे, हे राजकारण नाही का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विचारला होता. तर गुजरातमध्ये भाजपने रेमडेसिवीर चोरुन आणले होते का? असा टोला देखील नवाब मलिक यांनी याआधी लगावला होता.

दरम्यान, रोहित पवारांना वाटप करण्याइतपत रेमडेसिवीर इंजेक्शन कुठून मिळाले? रेमडेसिवीर तुम्हाला कुठून व कोणत्या ठिकाणाहून उपलब्ध झाले याचा रोहित पवारांनी खुलासा करावा. नाही तर तात्काळ सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

खेसारीलालच्या नव्या गाण्यानं केला कहर, काही तासात 4 कोटी व्ह्यूज!

असापण फ्रॅाड!; फेसबुक लाईव्ह केलं तर एका झटक्यात 26 हजारावरुन बिलाची रक्कम झाली 6 हजार!

“महाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘लॅाकशाही’ आहे, 2 मे ला सर्वांना धक्का बसेल”

शिवसेनेनं भाजपच्या देवेंद्र फडणवीसांपुढे ठेवला ‘हा’ नवा पर्याय!

5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, गावकऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More