बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

12 खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

नवी दिल्ली | 12 खासदारांच्या निलंबनाचा (12 MP’s Suspended) मुद्दा चांगलाच पेटताना दिसत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी चांगला गदारोळ पाहायला मिळाला. राज्यसभेतील 12 खासदारांच्या निलंबनानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. अधिवेशनातील गोंधळानंतर लोकसभेचं काम दुपारी 2 वाजेपर्यंत तहकुब करण्यात आलं.

राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू (Vyankayya Nayadu) यांनी 12 खासदारांचं निलंबन मागे घेण्यास नकार दिला. ही निलंबनाची कारवाई नियमांना धरून झाली असल्याचं नायडू यांनी स्पष्ट केलं. अधिवेशनातील गदारोळानंतर विरोधकांनी आज चर्चा करावी किंवा सभात्याग करावा, असं अल्टिमेटम नायडू यांनी दिलं.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधकांनी सभात्याग केला. त्यापाठोपाठ आता राज्यसभेतील विरोधकांनीही आक्रमक भूमिका घेत सभात्याग केला आहे.

राज्यसभेतील अध्यक्षांना कारवाई करण्याचा अधिकार आहे आणि तसेच सभागृह देखील कारवाई करू शकते, अशी भूमिका व्यंकय्या नायडू यांनी घेतली. पावसाळी अधिवेशनातील प्रकारावर नाराजी व्यक्त करत नायडू 12 खासदारांच्या निलंबनावर ठाम राहिले.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींची भेट टळली; ‘हे’ कारण आलं समोर

’25 वर्षाचा संसार मोडला’, असं म्हणणाऱ्या महाजनांना जयंत पाटलांनी दिलं हे सणसणीत उत्तर

पराग अग्रवालच्या नियुक्तीनंतर एलॉन मस्कने केलं भारतीय प्रतिभेचं कौतुक, म्हणाले…

‘आ देखे जरा…’; प्रविण दरेकरांच्या ‘त्या’ ट्विटवर मलिकांचं खास शैलित प्रत्युत्तर

पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीचा फडणवीसांना पश्चात्ताप, म्हणाले मी पुस्तक लिहून…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More