गुजरातची जनता परेशान, परंतु माझं जीवन अलिशान!

अहमदाबाद | सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी सीप्लेननं उड्डाण केलं. त्यांच्या या नामी युक्तीवर आता विरोधकांनी चांगलाच हल्ला चढवलाय.

गुजरात की जनता परेशान, पर मेरा जीवन तो आलिशान, असं ट्विट करत काँग्रेस नेता रणदीप सुरजेवाला यांनी मोदींचा समाचार घेतलाय.

 

पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलनंही मोदींच्या या सीप्लेन सफरवर तिरकस भाष्य केलंय. शेतकऱ्यांना लवकरच सीप्लेनद्वारे फवारणी करता येईल, असं हार्दिकनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

गुजरातचा तरुण नेता जिग्नेश मेवानीनंही मोदींच्या या कृत्याचा ट्विटरद्वारे समाचार घेतलाय.

दरम्यान, मोदींवर टीका करणाऱ्या विरोधकांवर भाजप समर्थकांनी हल्ला चढवलाय.