बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तीव्र विरोधानंतर ‘अग्निपथ’ योजनेबाबत राजनाथ सिंह यांनी घेतली महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली | केंद्राची अग्निपथ योजना वादादीत ठरली आहे. विरोधी पक्ष आणि देशातील अनेक तरुण या योजनेला विरोध करत आहेत. आता यावर विरोधकांची मनधरणी करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिल्लीत संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीची बैठक घेतली आहे. मात्र, या बैठकीत विरोधी पक्षांनी एकमताने या योजनेला विरोध केला.

विरोधी पक्षांनी या योजनेला तीव्र विरोध केला आणि ही योजना मागे घेण्याची मागणी लावून धरली. केंद्राला ही योजना तातडीने मागे घेता येत नसेल तर स्थायी समितीकडे पाठवून सविस्तर चर्चा करावी, अशी सूचना राजनाथ सिंहांना केली. या बैठकीत काँग्रेसचे मतभेद पहायला मिळाले. कारण काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी (Manish Tiwari) यांनी विरोधकांनी राजनाथ सिंह यांना दिलेल्या निवेदनावर सही करण्यास नकार दिला. तिवारी संरक्षणविषयक सल्लागार समितीचे सदस्य आहेत.

काँग्रेसने (Congress) अधिकृतपणे या योजनेला विरोध केला असला तरी, तिवरींनी पक्षावेगळे मत व्यक्त करुन अग्निपथला (Agnipath) पाठींबा दिला. काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार शक्तिसिंह गोहील (Shaktisingh Gohil) यांनी तीव्र विरोध करत, विरोधाची कारणे सांगितली. अग्निपथ योजना सर्वप्रथम संसदेत चर्चेला आणली पाहीजे. ही योजना अगोदर प्रायोगिक तत्वावर राबवून, त्याचे परीणाम तपासून निर्णय घ्यावा. तरुणांनी तीन तीन वर्षे मेहनत केली आहे, त्यांना सैन्यात कायमस्वरुपी (Permanent)भरती केले पाहीजे, असे गोहील म्हणाले.

सोमवारी 18 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु होत असून विरोधक केंद्र सरकारचे अग्निपथ करणार आहेत अशी परिस्थिती दिसते. देशभर विशेष करुन उत्तर प्रदेश (UP) आणि बिहार (Bihar) राज्यात तरुणांनी रस्त्यात उतरुन या योजनेचा निषेध केला होता. या योजनेत तरुणांना कंत्राटी (Temporary) म्हणून 4 वर्षे ठेवणार आहेत. नंतर त्यातील 25% लोक कायम करुन बाकीच्यांना इतर सरकारी नोकऱ्यांची हमी केंद्र सरकारने दिली होती. राजनाथ सिंह यांना विरोधकांनी दिलेल्या पत्रावर, काँग्रेसचे शक्तिसिंह गोयल, रजनी पाटील, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय, सौगत राय, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि राजदचे ए. डी. सिंह यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘मी काही इतक्या लवकर जात नाही’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

गाडीच्या हॉर्नच्या आवाजावर तरूणांनी केला नागीन डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा खेळ आता वेब सिरीजमध्ये दिसणार; “मी पुन्हा येईन” चा टीझर प्रदर्शित

खासदारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?, राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती

टाटांचं टेन्शन वाढणार; महिंद्राच्या 4 जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लवकर बाजारात येणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More