Top News

अभिनंदन यांच्या सुटकेवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आनंद!

नवी दिल्ली | भारताच्या हवाई दलाचा विंग कंमांडर अभिनंदन याची सुटका करणारं असल्याचं पाकिस्ताननं जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

भारताचा शूरवीर पुत्र विंग कंमांडर अभिनंदन त्याच्या कुटुंबासोबत उद्या पाहायला मिळेल आणि त्यानं दाखवलेल्या धाडसाचा मला अभिमान वाटतो, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

अभिनंदनच्या कुटुंबासोबत संपूर्ण देशवासीय त्याच्या सुरक्षित भारतात परतण्याची आतुरतेनं वाटं पाहत आहोत, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

अभिनंदन भारतात येणं हि त्याच्या कुटुंबासाठी आणि प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे, असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, नवज्योत सिंग सिद्धू, मेहबुबा मुफ्ती यांनी देखील अभिनंदच्या सुटकेचा आनंद व्यक्त केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

भारतीय लष्कराकडून कारवाईचे पुरावे सादर, पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा फाडला!

… तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करत राहू- भारतीय लष्कर

“सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा”

विरोधकांचं महागठबंधन म्हणजे महामिलावट आहे- नरेंद्र मोदी

‘मेरा बुथ सबसे मजबूत’ म्हणत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद, विरोधी पक्षांनी सोडलं टीकास्त्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या