नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षातील पाच नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे, असंही विरोधकांनी राष्ट्रपतींना सांगितलं. तसेच विरोधकांनी कृषी कायदा रद्द करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे.
राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षातील ने्त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. केंद्र सरकारने आणलेले कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. त्यामुळे ते रद्द करण्यात आले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
शेतकऱ्यांच्या ताकदीसमोर कुणीच उभा राहू शकत नाही. शेतकरी आता मागे हटणार नाहीत आणि कुणालाही घाबरणार नाहीत. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरूच ठेवतील, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला आहे- राहुल गांधी
मोदी सरकारचा ‘तो’ प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; शेतकरी मागणीवर ठाम
पुढील सुनावणीपर्यंत मराठा तरुणांचं काय?; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला सवाल
शेतकऱ्यांसाठी फ्री डिझेल; ‘या’ महामार्गावर सुरु आहे खास पुरवठा!
“देशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून नरेंद्र मोदी वसुली केंद्र करा”