सांगली | सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि पक्षावर सडकून टीका करत आहेत. याच मुद्यावरुन आमदार अमोल मिटकरी यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करत विरोधकांना खडसावलं आहे.
धनंजय मुंडे यांच्याबाबत विरोधकांनी राजकारण करु नये. आम्ही बोलायला लागलो, तर पळता भुई थोडी होईल, असा इशारा नाव न घेता अमोल मिटकरी यांनी भाजपला दिला आहे.
रविवारी 17 जानेवारी रोजी इस्लामपूर येथे राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये अमोल मिटकरी बोलत होते.
त्यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, प्रतीकदादा पाटील, कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, विनायक पाटील, विजयराव पाटील, शरद लाड, मनोज शिंदे, अविनाश पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते उपस्थित होते.
थोडक्यात बातम्या-
ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर! कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का
“धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात सहा गोळ्या घालेल”
तांडव वेब सीरिजच्या विरोधात लखनौमध्ये FIR दाखल
भास्करराव पेरे पाटलांना मोठा धक्का; पाटोदा ग्रामपंचायतीत सर्वात धक्कादायक निकाल
30 वर्षानंतर निवडणूक; पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारमध्ये असा लागला निकाल!
Comments are closed.